औष्णिक विद्युतनिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात ? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या ?

औष्णिक विद्युतनिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात ? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या ?

प्रश्न

 औष्णिक विद्युतनिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरतात ? या विद्युत निर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या ?

उत्तर

1. औष्णिक विदयुतनिर्मितीमध्ये कोळसा हे जीवाश्म इंधन वापरतात. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून विद्युतनिर्मिती केली जाते.

2. औष्णिक विद्युतनिर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या

i) हवा प्रदूषण : कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स यांसारखे हानिकारक आणि आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. 

ii) इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात. या घनरूप कणांमुळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात.

ii) कोळशाचे भूगर्भातील साठे मर्यादित आहेत. ते फार काळ पुरणार नाहीत. यामुळे पुढच्या काळात विद्युतनिर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर मर्यादा येतील.

Previous Post Next Post