ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण व हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा

ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण व हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा

प्रश्न

 ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशातील लोकसंख्येचे वितरण व हवामान यांचा सहसंबंध उदाहरणे देऊन स्पष्ट करा

उत्तर

i) ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात समशीतोष्ण स्वरूपाचे हवामान आढळते.

ii) समशीतोष्ण हवामान, पर्जन्याचे मध्यम प्रमाण, सुपीक जमीन व नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता इत्यादी अनुकूल घटकांमुळे या भागात शेती व इतर उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याचे आढळते.

iii) परिणामी, ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात लोकसंख्येचे दाट वितरण आढळते. 

iv) २०१० च्या जनगणनेनुसार ब्राझीलमधील आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात (सावो पावलो आणि रिओ दी जनेरिओ राज्यांत) लोकसंख्येची सरासरी घनता सर्वाधिक म्हणजेच ३०१ ते ५०० प्रति चौकिमी होती.

Previous Post Next Post