भारत व ब्राझील या देशांतील लोकसंख्यावाढीच्या दराची माहिती द्या

भारत व ब्राझील या देशांतील लोकसंख्यावाढीच्या दराची माहिती द्या

प्रश्न

 भारत व ब्राझील या देशांतील लोकसंख्यावाढीच्या दराची माहिती द्या

उत्तर

 

 

अ) भारतातील लोकसंख्यावाढीचा दर : 

i) भारतात १९७१ पर्यंत लोकसंख्यावाढीचा दर २ ते २.३ टक्क्यांनी वाढला होता.

ii) १९७१ ते १९९१ या दोन दशकांच्या कालावधीत भारतातील लोकसंख्यावाढीचा दर २.३ टक्क्यांने स्थिर झाल्याचे आढळते.

iii) १९९१ पासून वर्तमानकाळापर्यंत भारतातील लोकसंख्या वाढीचा दर मंद गतीने कमी होत असल्याचे आढळते.

iv) २०११ साली भारतातील लोकसंख्यावाढीचा दर सुमारे १.७ टक्के होता. 

v) झपाट्याने कमी झालेला मृत्युदर व तुलनेने मंद गतीने कमी होणारा जन्मदर यामुळे भारतातील लोकसंख्यावाढीचा दर संथपणे कमी होत आहे व त्यामुळे भारताची लोकसंख्या वाढत आहे.

ब) ब्राझीलमधील लोकसंख्यावाढीचा दर : 

i) १९७० ते २०१० या चार दशकांच्या कालावधीत ब्राझीलमधील लोकसंख्यावाढीचा दर सातत्याने कमी होत असल्याचे आढळते.

ii) ब्राझीलमध्ये १९७० साली लोकसंख्यावाढीचा दर सुमारे ३ टक्के होता व २०१० साली लोकसंख्यावाढीचा दर केवळ सुमारे १०.३ टक्का होता. 

iii) पुढील दोन दशकांत ब्राझीलमधील लोकसंख्यावाढीचा दर अत्यंत कमी असेल. म्हणजेच, पुढील दोन दशकांत ब्राझीलची लोकसंख्या वाढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.



Previous Post Next Post