वनस्पतींमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा.
उत्तर
i) वनस्पतींमध्ये अलैंगिक प्रजनन निरनिराळ्या प्रकारचे शाकीय प्रजनन करून होते.
ii) वनस्पतींची मुळे, खोड, पाने असे शाकीय अवयव ज्या वेळी प्रजनन करतात, त्या वेळी त्याला शाकीय प्रजनन म्हटले जाते.
iii) गाजर, मुळा, बीट अशी मुळे शाकीय प्रजननाच्या साहाय्याने नवे रोप तयार करतात.
iv) बटाटा, सुरण आणि इतर कंद त्यांच्यावरील मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात.
v) गवत, ऊस अशी खोडे त्यांच्या पेरांवरील मुकुलांची वाढ करून नवे रोप तयार करतात.
vi) काही वनस्पती उदा., पानफुटी तिच्या पानांच्या कडांवरील मुकुलांच्या साहाय्याने प्रजनन करते.