फुलाची रचना स्पष्ट करा

फुलाची रचना स्पष्ट करा

फुलाची रचना स्पष्ट करा.


उत्तर 

फुलाचे_अंतरंग
फुलाचे अंतरंग 


i) फूल हे वनस्पतीचे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फूलामध्ये एकूण चार मंडले असतात. त्यांपैकी दोन आवश्यक आणि दोन अतिरिक्त मंडले असतात. 

ii) निदलपुंज आणि दलपुंज ही अतिरिक्त मंडले आहेत. ही मंडले आतील मंडलांच्या संरक्षणाचे काम करतात.

iii) निदलपुंजातील घटक दलांना 'निदल' म्हणतात. ती बहुतेक वेळा हिरवी असून संरक्षक असतात.

iv) दलपुंजातील घटक दलांना 'पाकळ्या' म्हणतात आणि त्या विविधरंगी असतात. 

v) पुमंग आणि जायांग ही प्रजननाचे काम करणारी आवश्यक मंडले असतात. 

vi) पुमंग या पुल्लिंगी दलाच्या घटक दलांना पुंकेसर म्हणतात. प्रत्येक पुंकेसराला एक वृंत असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असून त्यात चार कप्पे किंवा कोष्ठक असतात. या कोष्ठकांमध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटल्यावर आतील परागकण बाहेर येतात.

vii) जायांग या स्त्रीलिंगी भागाच्या घटक दलांना स्त्रीकेसर म्हणतात. हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेसराचे अंडाशय, कुक्षीवृंत आणि कुक्षी असे भाग असतात. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात..

viii) उभयलिंगी फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले एकाच फुलात असतात. उदा., जास्वंदी

ix) एकलिंगी फुलामध्ये वरील दोहोंपैकी एकच मंडल असते. फक्त युमंग असणारे 'नर फूल' आणि फक्त जायांग असणारे 'मादी फूल'. उदा., पपई. 

x) पुष्पवृंत म्हणजे आधारासाठी असणारा फुलांचा देठ. ज्या फुलांना देठ असतो त्यांना 'पुष्पवृंती फुले' म्हणतात; तर देठ नसणाऱ्या फुलांना 'स्थानबद्ध फुले' म्हणतात.

Previous Post Next Post