फरक स्पष्ट करा मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था

फरक स्पष्ट करा मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था

फरक स्पष्ट करा मानवी पुरुष प्रजनन संस्था आणि स्त्री प्रजनन संस्था


 मानवी पुरुष प्रजनन संस्था

 स्त्री प्रजनन संस्था

 

1. वृषण उदरपोकळीच्या बाहेर वृषणकोशामध्ये असते. 

2. मूत्रजननवाहिनी एकच असते, ज्यातून मूत्र व रेत दोन्ही बाहेर पडू शकते. 

3. प्रजनन संस्था मरेपर्यंत कार्यरत राहते. 

4. पुयुग्मक अर्धसूत्री विभाजनाने वृषणात तयार होतात.

5. वृषणामध्ये लाखोंच्या संख्येने शुक्राणू तयार होत असतात.

6. पुरुष जनन संस्थेशी तीन प्रकारच्या ग्रंथी निगडित असतात.

7. वृषण हा मुख्य अवयव असतो. त्यातून शुक्रपेशी आणि पुरुषत्व देणारे संप्रेरक (टेस्टोस्टेरॉन) तयार होते.

 

1. प्रजनन संस्थेचे सर्व अवयव उदरपोकळीत असतात. 

2. मूत्रवाहिनी आणि योनी (जननवाहिनी) निरनिराळ्या असतात. 

3. प्रजनन संस्था रजोनिवृत्तीपर्यंतच कार्यरत राहते. 

4. स्त्रीयुग्मक अर्धसूत्री विभाजनाने अंडशयात तयार होतात. 

5. अंडाशयातून दर  महिन्याला केवळ एकच स्त्रीयुग्मक तयार होते.

6. स्त्री-जनन संस्थेशी केवळ एकच मुख्य प्रकारची ग्रंथी निगडित असते.

7. अंडाशय हा मुख्य अवयव असतो. त्यातून अंडपेशी आणि स्त्रीत्व देणारे संप्रेरक (इस्ट्रोजन) तयार होते.

Previous Post Next Post