फरक स्पष्ट करा उभयचर प्राणी व सरीसृप प्राणी

फरक स्पष्ट करा उभयचर प्राणी व सरीसृप प्राणी

फरक स्पष्ट करा उभयचर प्राणी व सरीसृप प्राणी

फरक स्पष्ट करा उभयचर प्राणी आणि सरीसृप प्राणी

उत्तर 

 उभयचर प्राणी

 सरीसृप प्राणी

 

1. पाणी आणि जमीन अशा दोन्ही अधिवासांत उभयचर आढळतात आणि या ठिकाणी ते श्वसन करू शकतात.

2. उभयचर प्राण्यांची त्वचा मृदू आणि कंकालविरहित असते.

3. शरीराचे डोके आणि घड असे दोन भाग असतात. मान नसते.

4. उपांगांच्या दोन जोड्यांतील पुढची छोटी आणि मागची मोठी असते.


5. अंगुलींना नखे नसतात.


6. पाण्यात असताना त्वचा आणि जमिनीवर असताना फुप्फुसे यांद्वारे श्वसन केले जाते.


7. प्रजनन करताना बाह्यफलन होते. 


8. अंडी आणि डिंबक (Tadpole) अशा वाढीच्या अवस्था असतात. स्थित्यंतर दिसून येते.


उदा., बेडूक, टोड, सॅलॅमँडर.

 

1. सरीसृप प्राणी बव्हंशी जमिनाका  राहतात. पाण्यात राहणारे कासव आणि पाणसाप हे पाण्यात श्वसन करू शकत नाहीत.

2. सरीसृप प्राण्यांची त्वचा खड असते, कारण त्यावर खवल्यांचा कंकाल असतो.


3. शरीराचे डोके, मान आणि घड असे असतात. मान असते.


4. उपांगांच्या दोन जोड्या समान असतात परंतु शरीराच्या मानाने कमकुवत असतात सापांमध्ये उपांगे लयास गेलेली असतात.

5. अंगुलींना नखे असतात.

6. केवळ फुप्फुसानेच श्वसन करू शकतात.

7. प्रजनन करताना अंतः फलन होते.

8. अंडी आणि पिल्लू अशा वाढीच्या अवस्था असतात. स्थित्यंतर दिसत नाही. 

उदा., कासव, पाल, साप.


Previous Post Next Post