प्रथिने कशापासून मिळतात ती कशापासून बनलेली असतात

प्रथिने कशापासून मिळतात ती कशापासून बनलेली असतात

प्रश्न

 प्रथिने कशापासून मिळतात? ती कशापासून बनलेली असतात?

उत्तर

 

 

i) प्रथिने हा एक अन्नघटक असून अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून प्रथिनाचा महारेणू बनतो.

ii) प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ले तयार होतात.

iii) ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात व रक्ताद्वारे प्रत्येक अवयव व पेशीपर्यंत पोहोचवली जातात.

iv) इथे पुन्हा प्रथिन संश्लेषण प्रक्रियेने त्यापासून शरीराची प्रथिने आवश्यकतेनुसार तयार होतात. काही वनस्पती पदार्थापासून आणि प्राणिज पदार्थांपासून प्रथिने मिळतात. 

v) प्राणिज प्रथिने 'फर्स्टक्लास प्रथिने' असतात. कारण त्यांच्यातील प्रथिनांची गुणवत्ता चांगली असते.

vi) प्रथिनांपासून प्रतिग्रॅम 4 Kcal एवढी ऊर्जा मिळते.


Previous Post Next Post