समुद्र किंवा नदीच्या पाण्यावरील तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात

समुद्र किंवा नदीच्या पाण्यावरील तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात

प्रश्न

 समुद्र किंवा नदीच्या पाण्यावरील तेलाचे तवंग कसे नष्ट केले जातात ?


उत्तर

 

 

i) पाण्यावर आलेला क्रूड तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करता येतो. पण हे कठीण असते.

ii) त्यामुळे जैविक पद्धतीने या तेलतवंगाला दूर करण्यासाठी अल्कॅनिव्होरॉक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास हे जीवाणू वापरले जातात.

iii) या जीवाणूंमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट होतात.

iv) हे जीवाणू हायड्रोकार्बनोक्लास्टिक बॅक्टेरिआ (HCB) असतात.

HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत CO2 व पाणी तयार होते. अशा रितीने समुद्र किंवा नदीमध्ये सांडलेल्या तेलाचे तवंग नष्ट केले जातात.


Previous Post Next Post