जर्मनीची सत्ता हाती येताच हिटलरने कोणती आक्रमक पावले उचलली ?
उत्तर
जर्मनीचा चान्सेलर असलेल्या हिटलरने १९३४ साली जर्मनीचे अध्यक्षपद स्वत: कडे घेऊन पुढील आक्रमक पावले उचलली :
i) व्हर्सायच्या तहाने जर्मनीवर लादलेली बंधने झुगारून दिली.
ii) सक्तीने लष्करी शिक्षण सुरू केले.
iii) लष्कर व नोेदलात वाढ केली आणि हवाई दलही उभारले.
iv) अदययावत शस्त्रास्त्रांचे उत्पादन सुरू केले.
v) या प्रयत्नांवर राष्ट्रसंघाचे बंधन येऊ नये म्हणून १९३४ साली राष्ट्रसंघाचे सभासदत्व सोडून दिले.
vi) सार प्रांतात सार्वमतापूर्वी दहशत निर्माण करून १९३५ साली हा प्रांत ताब्यात घेतला.
vii) ऱ्हाईनलगतच्या निर्लष्करी टापूत सैन्य पाठवून जबरदस्तीने या प्रदेशाचा ताबा घेतला.
viii) १९३७ साली इटली व जपानशी करार करून अक्ष राष्ट्रांना गट स्थापन केला आणि आपले सामर्थ्य वाढवले.