जर्मनीत हिटलरने कशा प्रकारे सत्ता मिळवली

जर्मनीत हिटलरने कशा प्रकारे सत्ता मिळवली

जर्मनीत हिटलरने कशा प्रकारे सत्ता मिळवली ?

उत्तर 

i) व्हर्सायचा लादलेला तह आणि इ.स. १९२९ ची जागतीक मंदीची लाट यांमुळे वायमर सरकारविरुद्ध जर्मन जनतेत असंतोष होता. 

ii) १९२२ साली माझी पक्ष स्थापन करणाऱ्या हिटलरने या परिस्थितीचा फायदा घेतला आणि देशापुढील सर्व समस्यांवर आपल्या पक्षाकडे रामबाण उपाय असल्याचा दावा करणारी भाषणे तो करू लागला. 

iii) भावना भडकवणारी भाषणे करून जनतेचे समर्थन मिळवण्याबरोबरच पक्ष संघटना बळकट करण्यावरही त्याने भर दिला. 

iv) तसेच तरुणांची निमलष्करी पथके (स्टाॅर्म ट्रूपर्स) निर्माण करून त्यांना नाझीवादाचे धडे दिले. 

v) ही पथके दहशतीचे मार्ग पत्करून विरोधकांना त्रस्त करू लागली. 

vi) हिटलरने केलेल्या या प्रयत्नांमुळे इ. स. १९२८ च्या राईशस्टॅगच्या निवडणुकीत त्याच्या पक्षात १२ सभासदांची संख्या इ. स. १९३२ च्या निवडणुकीत २३० इतकी वाढली. 

vii) अखेर १९३३ साली हिटलरने अल्पमतातील पक्षांचा पाठिंबा मिळवून जर्मनीचे चान्सेलरपद मिळवले. 

Previous Post Next Post