ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते

ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते

प्रश्न

 ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.

उत्तर

 

 

i) पेशीश्वसनामध्ये ग्लुकोजच्या रेणूचे पूर्णतः ऑक्सिडीकरण झाल्यास त्यापासून ATP चे 38 रेणू निर्माण होतात.


ii) पेशीश्वसनामध्ये ग्लायकोलायसीस क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया या तीन प्रक्रिया एकापाठोपाठ होत असतात. 

iii) जर अशा वेळी ऑक्सिजन नसेल, तर ग्लायकोलायसीस ही प्रक्रिया होईल पण पुढच्या दोन प्रक्रिया होणार नाहीत.


iv) शिवाय ग्लायकोलायसीस जर ऑक्सिजनशिवाय पार पडला तर त्यातून अल्कोहोलनिर्मिती होईल. त्याचप्रमाणे ATP चे केवळ दोनच रेणू निर्माण होतील, शरीरासाठी ऊर्जापुरवठा कमी होईल. म्हणून ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते.


Previous Post Next Post