प्रदूषणावर मात करणे हे पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे, हे कसे पटवून दयाल ते लिहा

प्रदूषणावर मात करणे हे पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे, हे कसे पटवून दयाल ते लिहा

प्रश्न

प्रदूषणावर मात करणे हे पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे, हे कसे पटवून दयाल ते लिहा. 

उत्तर

 

 

i) प्रदूषण या मानवनिर्मित समस्येचे अनेक प्रकार आहेत. हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक असे विविध प्रकारचे प्रदूषण पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी होत असते.

ii) प्रदूषित पदार्थांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीवांवर होतो. सजीवांचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात येते.

iii) जर प्रदूषणावर मात केली तर हेच सजीव जगू आणि टिकू शकतील. (4) प्रदूषणाला आळा घालणे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणे यांतून पर्यावरणाचे आपसूकच व्यवस्थापन होत असते. उदाहरणार्थ, प्लास्टिक इतस्ततः टाकण्यापेक्षा त्याचे योग्य नियोजन करून पुनः चक्रीकरण केल्यास प्लास्टिक प्रदूषण थांबेलच शिवाय प्लास्टिकच्या कचऱ्याने जलाशयातील आणि जमिनीवरच्या सजीवांची हानी होणार नाही. प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन केले तर या सजीवांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकते.


Previous Post Next Post