ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत लिहून मानवी शरीरावर ध्वनी प्रदूषणाचे कोणते परिणाम होतात

ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत लिहून मानवी शरीरावर ध्वनी प्रदूषणाचे कोणते परिणाम होतात

ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत लिहून मानवी शरीरावर ध्वनी प्रदूषणाचे कोणते परिणाम होतात. 

उत्तर 

I) ध्वनी प्रदूषणाचे स्त्रोत :

1) ओेेदयोगिकीकरण, शहरीकरण व आधुनिकीकरण या कारणांनी ध्वनी प्रदूषण होत असते. कारखान्यामूळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि कारखाने ध्वनी प्रदूषण अशी ध्वनी प्रदूषणाची दोन प्रमुख उगमस्थाने आहेत.  

2) कारखान्यांमुळे होणारे ध्वनी प्रदुषण: विविध कारखान्यांत चालणाया अतिजलद गतीच्या यंत्रामुळे उच्च तीव्रतेचा ध्वनी निर्माण होतो. यामुळे सर्वात जास्त आणि सतत ध्वनी प्रदुषण होत असते.

3) कारखानेतर ध्वनी प्रदुषण: घरगुती साधनांमुळे, विविध उपकरणांमुळे आणि वाहतुकीच्या साधनांमुळे निरनिराळ्या ध्वनी निर्माण होत असतात.

4) ध्वनी प्रदुषणाचे विविध स्त्रोत पुढील प्रमाणे आहेत:

i) रस्त्यावरील वाहतुकीमुळे निर्माण होणारा ध्वनी. 

ii) विमानांचा आवाज, 

iii) लोहमार्गावरील आवाज,

iv) बांधकामाच्या वेळी होणारे आवाज,

v) घरगुती वापराच्या विविध वस्तुंमुळे निर्माण शेणारा आवाज, 

vi) समांरभ, मिरवणुका, उत्सव आदींमुळे होणारे आवाज. 


II) मानवी शरीरावर हतनी प्रदुषणाचे होणारे परिणाम. 

1 मानवावरील ध्वनी प्रदुषणाचा परिणाम हा ध्वनीची तीव्रता, वारंवारता आणि कालावधी या तीन बाबींवर अवलंबून असतो. 

2) मानवी शरीरावर होणारे  ध्वनीचे परिणाम तीन प्रकारचे आहेत:

i) श्रवण शक्तीवर होणारा परिणाम: यामुळे ऐकायला त्रास होतो व बहिरेपणा येऊ शकतो. 

ii)  श्रवणेतर परिणाम: ध्वनीमुळे संवादात अडथळा येणे, झोप व एकाग्रता यांत समस्या निर्माण होणे, चिडचिड, अस्वस्थता, अतिरेकी वर्तन, मानसिक असंतुलन आणि कार्यक्षमतेल घट होणे असे परिणाम होतात.

iii) शरिरिक परिणाम: मळमळणे, थकवा येणे, अस्थिरता, उच्च रक्तदाब, दृष्टिदोष आणि निद्रानाश असे शारीरिक परिणाम नको असलेल्या ध्वनीमुळे होतात.

Previous Post Next Post