तुर्कस्तानमधील केमाल पाशाच्या हुकूमशाहीची माहिती लिहा.
उत्तर
i) पहिल्या महायुद्धानंतर केमाल पाशा या लष्करी सेनानीने सुलतानाविरुद्ध बंड पुकारून त्याला पदच्युत केले व तुर्कस्तानात गणराज्य स्थापनेची घोषणा केली.
ii) आपल्या लष्करी सामर्थ्याला प्रत्यय दोस्त राष्ट्रांना देऊन १९२३ साली सेवर्सचा तह रद्द करून नवा करार करण्यास त्याने भाग पाडले.
iii) हुकूमशहा असूनही केमाल पाशाचे धोरण लोकशाही =,राष्ट्रवाद व धर्मनिरपेक्षतेवर आधारलेले होते.
iv) आधुनिक दृष्टि असणाऱ्या केमाल पाशाचे मूलगामी सुधारणा करून तुर्कस्तानचे आधुनिकीकरण घडवून आणले.
v) प्रतिगामी सामाजिक रूढींना आळा घातला.
vi) तुर्कस्तानच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणली. अशा प्रकारे त्याची हुकूमशाही कल्याणकारी हुकूमशाही ठरली.