रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला

रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला

प्रश्न

  रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात कोणत्या मताचा आग्रह धरला ? 

उत्तर

 

 

फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त यांनी इतिहासलेखनात पुढील मताचा आग्रह धरला -

i) एखादी गोष्ट सत्य आहे, असे निःसंशयरीत्या निश्चित होत नाही, तोपर्यंत तिचा कदापिही स्वीकार करू नये.

ii) एखादया समस्येचे विश्लेषण आवश्यक तेवढेच करावे व आधी छोट्या समस्या व नंतर मोठ्या समस्या या क्रमाने विचार मांडावेत.

iii) इतिहासलेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांसारख्या ऐतिहासिक साधनांची विश्वासार्हता तपासून घेतली पाहिजे.


Previous Post Next Post