अशिक्षित करतडे आजोबाचे भावविश्व थोडक्यात लिहा

अशिक्षित करतडे आजोबाचे भावविश्व थोडक्यात लिहा

अशिक्षित करतडे आजोबांना शिक्षणाबद्दल असलेले प्रेम व त्यांची निस्वार्थ भावना स्पष्ट करा ?

किंवा 

हिंमतराव बावस्कर यांच्या कष्टप्रधान जीवनाचा आढावा लिहा ?

किंवा 

अशिक्षित करतडे आजोबाचे भावविश्व थोडक्यात लिहा ?

उत्तर 

पदरी पडले पवित्र झालं या वेचामध्ये आपल्या कष्टप्रद जीवनातील घटना व प्रसंग यांचा आढावा घेतला आपले करतडे आजोबांना शिक्षणाबद्दल असेलेले प्रेम त्यांनी निस्वार्थ भावना या बद्दल अत्यंत ओघवत्या शैलीतून व्यक्त केले आहे. 

आई-वडिलांनी हिंमतराव हे मुलाचे नाव ठेवले होते. पण अंबाजोगाई येथे वधुपक्षाकडे मागणी घालण्यासाठी गेल्यावर 'हिंमतराव' असे नाव सांगता वधुने आपल्या वडीलांना तो शेतकरी असल्याच्या संशयावरून त्याला नकार दिला जातो. हिंमतरावाचे वडील आमचा मुलगा हुशार संशोधक आहेम्हणून सांगतो पण लग्नसाठी नकार मिळतो. 

हिमंतरावांना आपल्या नावावरून शाळेत देखील खूप चिडवायचे अशा या हिमंतरावाचा जन्म रझाकारांच्या दहशतीच्या काळात आई रखमाईच्या कशीत झाला. गावामध्ये बारीकबारीक गोष्टीवरून खूप वादविवाद होत जायचे त्याला काय रझाकारांसारखा वागतोस ? असे नाव ठेवले जात होते. इ.स. १९४८-५० हा काळ रझाकारांचा होता. हे रझाकार खेड्यात जाऊन बळजबरीने अन्नधान्य व संपती लुटत आणि स्त्रियांवर अत्याचार करीत. आमच्या घरासमोर काशीनाथ जाधव यांनी रझाकाराचा अनुभव घेतला होता. रझाकार गावात आला म्हणजे सगळीकडे भीतीचे वातावरण होते. उदा: पोटूशी असलेल्या स्त्रियालाही बाळतपणाच्या कळा यायला सुरुवात होत. अशी दहशत  रझाकारांची होती. पण त्यातील एक  रझाकार आमच्या गावात आसरा मागण्यासाठी येतो. सर्वानी आसरा देण्याचे ठरवितात पण सर्वानी ते मंजूर केल्यावर सर्वासमोर खरोखरच चाकू घेऊन तो मुलाच्या अंगावर धावला हे पाहून गावकऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानाची मागणी फेडाळून लावली.

आई-वडील अशिक्षित असल्यामुळे जन्मतारीख व वेळ माहिती नाही. ज्योतीषिदेखील माझे अचूक भविष्य करू शकत नाही. असे वडील नेहमी सांगत होते. परंतु माझा भविष्यावर विश्वास बसत नाही. माझा जन्म ओेेरंगाबाद (जालना) जिल्हयातील पांचशे वस्तीच्या देहेड या गावी झाला. शिक्षणाचे वारे न लागलेल्या ह्या अशिक्षित कुटूंबात सर्वात होतकरू व मदत करणारी व्यक्ती म्हणजे वडील होय. 

आई ही अत्यंत कर्तृत्ववान, हिंमतवान, जिद्दी व कष्टाळू होती. कारण आईचे वडील तुळशीराम पाटील हे भोकरदन तालक्यातील धडाडीचे व्यक्तिमत्व असून दगडवाडीचे पोलीस पाटील होते. त्यांची मुलगी स्वत: घोड्यावर बसून फिरायची, धाडसी व्यक्तिमत्त्वाची होती. म्हणूनच आई जरी श्रीमंत कुटूंबात जन्मली असली तरीतिचा विवाह अतिशय गरिबीत असलेल्या श्री. साळूबा बावस्कर यांच्याशी संपन्न झाला. अतिशय हालाकीची परिस्थिती, रात्रदिवस कष्ट करून देखील कुटूंब सांभाळणे कठीण जात होते. पदोपदी व क्षणोक्षणी आईला गरिबीची चाहूल देत होती. अशा अवस्थेत एका गर्भ श्रीमंताची मुलगी एका दारीद्रयात, गरिबीत जीवन जगणाऱ्या माणसासोबत म्हणजे माझ्या वडिलासोबत संसार करते म्हणून आई वैतागून की, "पदरी पडलं आणि पवित्र झालं" हे खरचं आहे. 

माझे आजोबा माझे वडील लहान असतानाच वारले होते. त्यामुळे माझ्या वडिलांचा सांभाळ मामा पाटील करतडे यांनी केला. आमचे करतडे आजोबा म्हणजे गाडगेबाबाचं होते. नि:स्वार्थी बुध्दीने मुलांना सांभाळून लहानाचे मोठे केले. आठ वर्षे सालगडी राहून आठ एकर जमीन घेतली व मनामध्ये न संकोच करता सर्व जमीन वडिलांच्या नावे केली. करतडे आजोबा रंगाने काळे होते. अंगावर फक्त धोतर, शर्ट कधीही वापरला नाही. अडाणी असल्यामुळे मंजूरीचे किती दिवस व किती पैसे झाले हे घरी विचारून मजुरी घेण्यासाठी जात असतं. 

आईवडिलांना आम्हांला शिक्षणासाठी बुलढाण्याला घेऊन गेले. बुलढाण्यातील खोली दहा बाय सहा फुटाची असल्यामुळे तुम्ही देहेड गावातच रहावे असे आजोबाला वडिलांनी सांगितले पण भाच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या करतडे आजोबांनी बुलढाण्यालायेऊन एका तुकारामदादा मूळे यांच्या शेतातील गोठ्यावर गुरे सांभाळयासाठी नोेकरी राहिले. 

आठदिवसांनी ते भाच्याला भेटण्यासाठी खोलीवर येत होते. विशेष म्हणजे आजोबाला मालकांनी दिलेल्या जेवणातून दररोज एक भाकर काढून ठेवत आणि आठ दिवसांनी त्या भाकरी खोलीवर घेऊन जात. मला आमची आई- त्याभाकरीचे कुटके करून देत असायची. आमच्या आजोबांचा संसार म्हणजे पाणी पिण्याचे मडके व एक परोळ असा होता. 

करतडे आजोबा शेतातून गावात आमच्या भेटीसाठी यायचे तेव्हा रस्त्यांना पडलेले पेपरचे तुकडे गोळा करून आम्हाला आणून द्यायचे आम्ही ते तुकडे जोडून आजोबाला वाचून दाखवित होतो. हे पाहून माझी नातवडे शिक्षण घेतात, वाचन करतात आजोबाला यांचा आनंद गगनात मावेनासा होत होता. ते खुप आनंदी रहायचे आपण एका निरनिराळ्या जगामध्ये प्रवास केला असा भाव त्यांच्या चेहऱ्यातून व्यक्त हात होता. अशिक्षित व्यक्तिमध्ये शिक्षणाबद्दल एवढे प्रेम असलेला चेहरा मानंदीत होता. 

सर्वजण माळकरी असल्यामुळे घरात मटणाची भाजी होत नव्हती. पण आजोबाला मटण खायला आवडत होते. म्हणून आमची आई आठ-पंधरा दिवसांनी आजोबांना मटणाची भाजी करून देत होती. 

करतडे आजोबांचे वय खूप झाल्यामुळे त्यांना मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे त्यांच्या बुध्दीवरचा ताबा सुटला जातो. जीवनात खूप कष्ट केल्यामुळे त्यांना शेती, बैल, यांचे गाणे म्हणत सुटायचे हातापायला सुज आली होती, मल-मूत्रावरील नियंत्रण काही ओेषधोपचार न मिळता ते दगावले. शिक्षणरूपी अमृत पाजण्यासाठी व नंतर डॉक्टर होण्यासाठी ज्या करतडे आज्याने जीवनाचे योगदान महत्त्वपूर्ण होते. त्यांनी आयुष्यभर व शेवटच्या आजारपणांत काही ओेषधोपचार न करता जीवन संपवले अशा आजोबांसाठी आजही माझे डोळे पाणावलेले आहेत. माझे आजोबा म्हणजे आमच्या कुटुंबाचे दैवतच होते. असा भाव व्यक्त होतो.


Previous Post Next Post