तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल ? का?

तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल ? का?

प्रश्न

 तुमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात कोणकोणत्या बाबी तुम्ही तपासून पाहाल? का? 


उत्तर

 

 

आमच्या शाळेसाठी आपत्तीपूर्व व्यवस्थापनासंदर्भात पुढील बाबी आम्ही तपासून पाहू:

i) शाळेचे फोन व्यवस्थित चालू आहेत का?

ii) शाळेच्या प्रत्येक वर्गात प्रथमोपचार पेटी आहे किंवा नाही?

iii) शाळेत काही मूलभूत औषधे आहेत का? 

iv) लहान वर्गातील मुलांच्या मदतीला झटकन धावून जातील अशी टीम तयार आहे का ?

v) शाळेच्या प्रत्येक वर्गप्रतिनिधीने अभिरूप सरावात भाग घेतला आहे का? तो/ती प्रथमोपचार जाणतो / जाणते का?

vi) पालक प्रतिनिधींचा संपर्क माहीत आहे का ?

vii) शाळेत वैद्यकीय अधिकारी कधी हजर असतो ?

viii) शाळेत पुरेसे पिण्याचे पाणी आणि थोडा सुका खाऊ उपलब्ध असतो का?

ix) शाळेतील जिने व मार्गिका जलद दळणवळणासाठी मोकळे आहेत की नाहीत?




Previous Post Next Post