प्रश्न | कर्बोदके, स्निग्धपदार्थ, प्रथिने यांचे ऑक्सिडीकरण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते ? |
उत्तर
| i) सर्वप्रथम आहारातील कर्बोदकांचे पचन संस्थेतील विकरांच्या साहाय्याने पचन होऊन त्यापासून ग्लुकोज बनते. तसेच स्निग्धपदार्थापासून मेदाम्ले व अल्कोहोल (ग्लिसरॉल) बनते. प्रथिनांपासून अमिनो आम्ले मिळतात. ii) कर्बोदकांचे पेशीश्वसनाने पूर्ण ऑक्सिडीकरण होते. ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे तीन टप्प्यांत ऑक्सिडीकरण होते. हे टप्पे- ग्लुकोज-विघटन, क्रेब चक्र आणि इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया असे असतात. iii) ग्लुकोज-विघटन प्रक्रियेत ग्लुकोजच्या एका रेणूपासून पायरुविक आम्ल, ATP, NADH2 आणि पाणी या साऱ्यांचे प्रत्येकी दोन-दोन रेणू तयार होतात. या पायरुविक आम्लाचे रूपांतर अँसेटिल-को-एन्झाइम-A या रेणूत होते. तसेच NADH2 व कार्बन डायऑक्साइडचे दोन रेणू तयार होतात. iv) याच्यानंतर क्रेब चक्राच्या टप्प्यात अँसेटिल-को-एन्झाइम-A चे रेणू तंतुकणिकेत शिरतात. तेथे चक्रीय अभिक्रियेने अँसेटिल भागाचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते व त्यात CO2, H2O, NADH2, FADH2, आणि ATP चे रेणू तयार होतात. v) तिसऱ्या टप्प्यात, ई.टी.सी. प्रक्रिया होते. पहिल्या दोन टप्प्यांत तयार झालेले NADH2 आणि FADH2 या रेणूंचा वापर ATP रेणू मिळवण्यासाठी केला जातो. प्रत्येक NADH2 रेणूपासून तीन आणि प्रत्येक FADH2 रेणूपासून दोन ATP रेणू तयार होतात. vi) अशा रितीने ग्लुकोजच्या एका रेणूच्या संपूर्ण ऑक्सिडीकरणाने ATP चे 38 रेणू तयार केले जातात. कर्बोदकांपासून ऊर्जा अशी तयार होते. vii) आहारात कर्बोदकांचे प्रमाण पुरेसे नसेल तर ऊर्जानिर्मितीसाठी मेद व प्रथिनांचा वापर केला जातो. मेदापासून मिळालेली मेदाम्ले आणि प्रथिनांपासून मिळालेली अमिनो आम्ले हे दोन्ही अँसेटिक-को-एन्झाइम-A मध्ये रूपांतरित होतात. हे अँसेटिल को A चे रेणू क्रेब चक्रात अभिक्रिया होऊन त्यापासून ऊर्जा मिळवली जाते. |
- Home
- Pages
- _Privacy and policy
- _Contact Us
- _Disclaimer
- Another blog
- इयत्ता दहावी
- _इतिहास
- __इतिहासलेखन पाश्चात्त्य परंपरा स्वाध्याय
- __इतिहासलेखन भारतीय परंपरा स्वाध्याय
- __उपयोजित इतिहास स्वाध्याय
- __भारतीय कलांचा इतिहास स्वाध्याय
- __प्रसारमाध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास स्वाध्याय
- __खेळ आणि इतिहास स्वाध्याय
- __पर्यटन आणि इतिहास स्वाध्याय
- __ऐतिहासिक ठेव्यांचे जतन स्वाध्याय
- _राज्यशास्त्र
- __संविधानाची वाटचाल स्वाध्याय
- __निवडणूक प्रक्रिया स्वाध्याय
- __राजकीय पक्ष स्वाध्याय
- __सामाजिक व राजकीय चळवळी स्वाध्याय
- __भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने स्वाध्याय
- _भूगोल
- __क्षेत्रभेट स्वाध्याय
- __स्थान विस्तार स्वाध्याय
- __प्राकृतिक रचना व जलप्रणाली स्वाध्याय
- __हवामान स्वाध्याय
- __नैसर्गिक वनस्पती व प्राणी स्वाध्याय
- __लोकसंख्या स्वाध्याय
- __मानवी वस्ती स्वाध्याय
- __अर्थव्यवस्था आणि व्यवसाय स्वाध्याय
- __पर्यटन वाहतूक व संदेशवहन स्वाध्याय