फरक स्पष्ट करा संपृक्त हायड्रोकार्बन व असंपृक्त हायड्रोकार्बन

फरक स्पष्ट करा संपृक्त हायड्रोकार्बन व असंपृक्त हायड्रोकार्बन

फरक स्पष्ट करा संपृक्त हायड्रोकार्बन व असंपृक्त हायड्रोकार्बन

फरक स्पष्ट करा संपृक्त हायड्रोकार्बन आणि असंपृक्त हायड्रोकार्बन

उत्तर 

 संपृक्त हायड्रोकार्बन

 असंपृक्त हायड्रोकार्बन

 

1. ज्या हायड्रोकार्बनमध्ये प्रत्येक कार्बन अणूच्या चारही संयुजा एकेरी बंधाने संपृक्त झालेल्या असतात, त्या हायड्रोकार्बनला संपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात.

2. या संयुगात सर्व बंध हे एकेरी बंध असतात.

3. याचे सामान्य सूत्र CnH2n+2 आहे.

4. यांची क्रियाशीलता कमी असते.

 5. या संयुगात विस्थापन अभिक्रिया घडून येतात. 

 

1. ज्या हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणूंच्या संयुजा एकेरी सहसंयुज बंधाने संपृक्त झालेल्या नसतात, त्या हायड्रोकार्बनला असंपृक्त हायड्रोकार्बन म्हणतात.

2. या संयुगात कार्बन - कार्बन दुहेरी किंवा तिहेरी बंध असतात.

 3. याचे सामान्य सूत्र CnH2n  किंवा CnH2n-2 असते.

4. यांची क्रियाशीलता जास्त असते. 

5. या संयुगात समावेशन अभिक्रिया घडून येतात.



Previous Post Next Post