स्त्रियांच्या जगण्यातील दाहकता आणि सोशिकता सूप आणि जातं या कवितेद्वारे स्पष्ट करा

स्त्रियांच्या जगण्यातील दाहकता आणि सोशिकता सूप आणि जातं या कवितेद्वारे स्पष्ट करा

स्त्री-पुरुषांच्या नातेसंबंधातील विदारक वास्तव कवयित्रीने 'सूप आणि जातं' या कवितेतून कसे साकारले ते लिहा ?

किंवा 

स्त्रियांच्या जगण्यातील दाहकता आणि सोशिकता 'सूप आणि जातं' या कवितेद्वारे स्पष्ट करा ?

उत्तर 

'सूप आणि जातं' ही कविता स्वाती शिंदे-पवार या कवियित्रीची आहे. ही कविता वेदनेच्या खोल तळाशी या काव्य संग्रहातील असून प्रस्तूत कवितेत 'सूप आणि जातं' या प्रतिमांद्वारे सनातन प्रवृत्तीमुळे समाजातील स्त्री-पुरुषाच्या नातेसंबंधातील विदारक वास्तव स्पष्ट केले. तसेच स्त्रीयांच्या जगण्यासाठी दाहकता आणि सोशिकता विलक्षण संवेदनशीलतेने प्रकट केलेली दिसून येते. 

"सुख ओटीत माझिया 

सूप म्हणते जात्याला 

फिर खुंटयाच्या भोवती 

शोध स्वत:च्या नात्याला"

येथे सूप आणि जातं या प्रतिमांचा उपयोग केला आहे. स्त्री-पुरूषातील नातेसंबंध व्यक्त करताना सूप जात्याला म्हणते की, सुख माझ्या ओटीत आहे. खुंटयाच्या भोवती फिरून तुम्ही स्वत:च्या नात्याला शोधावे. हे नाते स्त्री-पुरूषांचे आहे. 

"सारा भरडा पडतो 

इथं तुझ्याच श्रमाचा 

लख्ख लेबल लागते

शिक्का माझ्याच कामाचा"

स्त्रीयांच्या जीवनातील सोशीकता व दाहकता येथे दिसून येते. स्त्री ही पूर्वी पासूनच कष्टकरी आहे, सारे काम तीच करते. घरातील सर्वकामे मीच करते. सर्व कामे तुम्हालाच करावे लागते. पण शिक्का मात्र माझ्याच नावाचा चालतो. येथे स्त्री-पुरुषांच्या कामाचे वर्णन इथे येते. कुटूंबासाठी पुरुष हा कर्ता म्हणून सर्वच कामे करतो. परंतु कुटूंबामधील स्त्रीचांच शिक्का तयार होतो. स्त्रीमुळेच घरातील संसार ओळखला जातो असा विचार प्रकट होतो. 

"बाई जात्याच्या भोवती 

फिरे त्याच्याच नात्यात 

सूप फेकते फोलाला 

दाणे ठेवते ओटयात"

घरातील स्त्री ही आपला संसार, आपला नवरा, आपली मूले, जनावरे, ढोर, शेतीवाडी, पैसाअडका म्हणतच घरामध्ये राबराब राबते. परंतु घरामध्ये मात्र तिला कोेडीमोल किंमत राहत नाही. तिच्या कामाची कोणीही घरातील व्यक्ती दखल घेत नाही. तीची अवस्थ दाण्यातील फोलासारखी होते. 

"नाते सुपाचे जात्याचे 

पती-पत्नीच्या नात्याचे 

एक फिरते भरारा 

दुज्या नावाचा दरारा"

'सूप आणि जातं' यांचे नाते अगदी पती-पत्नी सारखे असते. संसार करतांना संसारासाठी लागणाऱ्या वस्तु, घर व इतर साहित्य मिळविण्यासाठी घरातील पुरुषांना मोठी कसरत करावी लागते. स्त्रीचा मात्र घरामध्ये, संसारामध्ये अधिकार असतो. कारण संसारामध्ये स्त्री हीच पुरूषांचे मन जाणणारी व आप्तसोकियांचेही मन ओळखणारी असते. स्त्री ही कुटुंबाचा आधार असते. त्यामूळे तिच्या नावाचा दरारा जास्त असतो. 

"किती झिजावे जात्याने 

घाव टाकीचे सारव 

तरी टोचते हातांना"

टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, म्हणून जात्याने किती झिजावे. 

"जात बाईची जात्याची 

घास घातले स्वत:ला 

किती आरास देखणी 

सूप पुरुष होताना"

स्त्री म्हणजे जातं आहे. स्वत खुप कष्ट करते. स्वत:ला घास घास घासते: म्हणजेच संसार करण्यासाठी खुप कष्ट करून जीवन जगावे लागते. सुप म्हणजे पुरुष होय. पुरुषांनाही खूप कष्ट करून कुटुंब चालवावे लागते. किती आरास देखणी सूप पुरुष होताना. आपण जर पुरुषांच्या जन्मा आलो असतो तर सुख उपभोगलो असतो अशी संवेदनशीलवृत्तीचा विचार मांडला आहे. 

थोडक्यात सूप आणि जातं या प्रतिमाद्वारे स्त्री-पुरूषातील वास्तव विदारक सत्यरूपात मांडले. त्याच बरोबर स्त्रीही हळूवारपणे, तिच्या जीवन जगण्यातील दाहकता आणि सोशिकता याचा विलक्षण विचार संवेदनशील वृतीतून दिसून येतो. 

Previous Post Next Post