फरक स्पष्ट करा पक्षी व सस्तन प्राणी

फरक स्पष्ट करा पक्षी व सस्तन प्राणी

फरक स्पष्ट करा पक्षी व सस्तन प्राणी


 पक्षी 

 सस्तन प्राणी 

 

1. पक्षी पूर्णपणे खेचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. 

2. शरीर निमुळते असून शीर, मान व धड या स्वरूपात असते. 

3. उपांगांच्या दोन जोड्या असतात. परंतु अग्रउपांगे पंखांमध्ये परिवर्तित झालेली असतात. 

4. अंगुलींना नखे असतात.  

5. बाह्यकंकाल पिसांच्या स्वरूपात असतो. 

6. जबड्याचे रूपांतर चोचीत झालेले असते. 

7. पक्षी अंडज असतात. 

8. अंडी व पिल्लांची दोन्ही पालकांकडून काळजी घेतली जाते. 

उदा., मोर, पोपट, कबुतर, बदक, कावळा चिमणी, पेंग्वीन. 

 

1. सस्तन प्राणी पूर्णपणे भूचर जीवनासाठी अनुकूलित झालेले आहेत. 

2. शरीर निमुळते नसून शीर, मान, धड व शेपूट या स्वरूपात असते. 

3. उपांगांच्या दोन जोड्या असतात. एक जोडी जमिनीवर चालण्यासाठी अनुकूलित झालेली असते. 

4. अंगुलींना नखे, खूर इत्यादी असतात. 

5. बाह्यकंकाल केसांच्या किंवा लोकरीच्या स्वरूपात असतो. 

6. जबड्यावर दात असतात. मुखाला जबड्याचे आच्छादन असते. 

7. सस्तन प्राणी जरायुज असतात. (अपवाद : प्लॅटीपस). 

8. केवळ आईच पिल्ल्यांना दूध-ग्रंथीतून दुध पाजून वाढवते. 

उदा., मानव, कांगारू, डॉल्फीन, वटवाघूळ, कुत्रा, मांजर.     


Previous Post Next Post