शीतयुद्धाची कोणतीही तीन कारणे सविस्तर लिहा.
शीतयुद्धाची कोणतीही तीन कारणे लिहा.
उत्तर
दुसऱ्या महायुद्धानंतर जगात सुरू झालेल्या शीतयुद्धाची कारणे खालीलप्रमाणे आहेत :
अ) समाजवादाचा उदय : १९१७ साली सोविएत रशियात समाजवादी राज्याची स्थापना झाली. पाश्चात्त्य राष्ट्रांच्या दृष्टीने ही घटना म्हणजे यांच्या लोकशाही. व भांडवलशाही जीवनपद्धतीला मोठा धोका आहे, असा समज करून ही राष्ट्रे हे समाजवादी राज्य नष्ट करण्याच्या प्रयत्न करू लागली.
ब) रशियन सामर्थ्याचा प्रत्यय : दुसऱ्या महायुद्धाकाळात पाश्चात्त्य राष्ट्रांना सोविएत रशियाच्या लष्करी सामर्थ्याचा प्रत्यय आला. युद्धाच्या अखेरपर्यंत पूर्व युरोपीय राष्ट्रांवर सोविएत रशियाचा प्रभाव होता. या प्रभावामुळे या देशांत साम्यवादाचा प्रसार होऊ लागला. यांमुळे युरोपीय राष्ट्रे अस्वस्थ होऊ लागली.
क) साम्यवादाच्या प्रसाराला विरोध : साम्यवादाचा पूर्व युरोपीय राष्ट्रांवर पडलेला प्रभाव पाहून पाश्चात्त्य युरोपीय राष्ट्रे अस्वस्थ होऊ लागली. १९४३ साली फुल्टन येथील भाषणात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी साम्यवादाच्या प्रसाराला प्रतिबंध करण्याचे आवाहन लोकशाही देशांना केले. अमेरिकेने हे आव्हान स्वीकारले. त्यातून दोन महासत्तांत तेढ निर्माण झाली.
ड) लष्करी करार : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांनी 'ट्रूमन सिद्धांत' व 'मार्शल योजने' ची घोषणा करून समविचारी राष्ट्रांशी नाटो, सेंटो, सीटो असे लष्करी करार केले; तर सोविएत रशियानेही इतर समाजवादी राष्ट्रांशी वाॅर्साचा लष्करी करार केला.
इ) राष्ट्रगटांतील स्पर्धा : समाजवादी व भांडवलवादी गटांत जगाची विभागणी झाली. प्रत्येक गट आपले प्रभावक्षेत्र विस्तारू लागला. अनिर्बध शस्त्रास्त्र स्पर्धा सुरू झाली.