डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उच्च शिक्षणाविषयक विचार स्पष्ट करा ?
किंवा
डॉ. बाबासाहेबांनी आपल्या भाषणातून उच्च शिक्षणाचे महत्त्व कसे पटवून दिले ?
उत्तर
"भावी जीवनाची उभारणी विद्यापीठात होते....'
हा प्रस्तूत घटक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये केलेले भाषण होय. डॉ. आंबेडकरांचे उच्च शिक्षण विषयक विचार नेमक्या शब्दांत व्यक्त झाले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे भाषण एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये सोमवार दिनांक १५ डिसेंबर १८५२ रोजी संपन्न झाले. या भाषणातून त्यांनी उच्चशिक्षणाबाबत विद्यापीठ स्तरांवर चालवला जाणारा अभ्यासक्रम व विद्यापीठामार्फत शिक्षण घेणारे विद्यार्थी यांची स्थिती मांडली आहे. आजचे विद्यार्थी ज्या विद्यापीठाचे शिक्षण घेतात त्याच्या कारभाराकडे विद्यार्थ्याच्या मुळच ळाक्ष राहत नाही. विद्यार्थ्यानी काय शिकावे हे विद्यापीठ ठरविते. परंतु विद्यार्थ्याच्या बोेध्दिक विकासाला ते ज्ञानपोषक आहे की नाही ? हे विद्यार्थ्यानी स्वत:हून पाहावे. कारण त्यांच्या भावी जीवनाची उभारणी याच ठिकाणी होत असते. तो उद्याचा भारतीय (राष्ट्राचा) आदर्श नागरिक होणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये आपण घेतलेल्या शिक्षणाचा फायदा किती होतो. की त्याचे जीवित विफल होणार हेही शिक्षणक्रमच ठरविणार असल्यामुळे विद्यापीठाच्या प्रत्येक हालचालीवर विद्यार्थ्याचे कटाक्षाने लक्ष पाहिजे. पण आजचे विद्यापिठीय शिक्षण घेणारे तरुण मात्र विद्यापिठाने लादलेले शिक्षण पूर्ण करून निरोउद्योगी राहतात. याचे कारण त्या विद्यार्थ्याची बोेध्दिक, भावनिक, शारिरीक विकासच होत नाही. त्यासाठी विद्यापीठीय अभ्यासक्रमातील परिवर्तनांवर लक्ष ठेवूनच शिक्षण घ्यावे. कारण महाविद्यालयीन जीवन हा आपल्या जीवनातील माणूस म्हणून जगण्यासाठी मोेल्यवान असतो.
उच्च महाविद्यालयामध्ये शिक्षण घेऊन चार वर्षानी विद्यार्थी बाहेर पडतो. पण त्यांना प्लेटो, बेकन, नित्ये, स्पिनोझा, यासारखा महाश्रेष्ठ तत्वज्ञानासंबंधी अवाक्षरही माहिती नसते. ज्या तत्वज्ञानाने नव्या जगावी उभारणी केली किंबहुना आजचा नव मानव आपल्या प्रत्येक दैनंदिन जीवनात ज्या तत्वज्ञानावर जगत आहे, थोर तत्वज्ञानाची अपेक्षा होते. हे आजच्या विद्यापीठीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी लक्षात ठेवावे. जेम्स आणि चार्लस यांचे तत्वज्ञान विद्यार्थ्याच्या माथी विद्यापीठ मारत आहे. ज्यांना आपला शाश्वत विकास होत नाही. यासाठी विद्यार्थ्यानी या गोष्टी स्वत:च ओळखायला पाहिजेत. कोणते शिक्षण व अभ्यासक्रम आपल्या जीवनात उपयोगी पडणार याकडे विद्यार्थ्यानी लक्ष केंद्रित करावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, "मानवी जीवनातील वैचारीक आणि नैतक मूल्ये कधीच स्थिर राहिली नाहीत. ती कालगानाप्रमाणे प्रत्यही बदलत राहतात. नुसती बदलतच नाही तर ती प्रगत होत जातात". या साठी भारतीय विद्यार्थ्यानी या नव्या नव्या निर्माण होणाऱ्या जीवनमूल्यांची दखल घेतली पाहिजे.
आधुनिक विद्यार्थ्यानी बोेध्दिक आणि वैचारिक पातळी रोडावत आहे. याचे कारण म्हणजे भूतकाळातील मानवाशी तुलनाच होऊ शकत नाही. ही बोेध्दिक पातळी विद्यार्थी वर्ग भूतकालीन प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत यांच्या तत्त्वज्ञान व वाड्मयकृतींचा अभ्यास मन लावून करत नाहीत.
पूर्वी गुरुकुले अस्तित्वांत होती. एकांतात विद्या शिकवीत असत. रानावनातून ही विद्यापीठे प्रस्थापित झाली. विद्यापिठीय शिक्षणासाठी उभारली याचे कारण म्हणजे त्यांना विद्येच्या अभ्यासाने मात्र क्रीडा आणि राजकारणांच्या फंद्यात पडून विद्यार्थ्याची दूरदृष्टीच नष्ठ होतांना दिसून येत आहे. म्हणून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याना चांगले काय आणि वाईट काय हे स्वत:च्या नैतिक बुध्दीने ठरवावी.
आज विद्यापीठीय उच्च शिक्षणातील अध्यापकीय कार्य म्हणजे सांगता सोय नाही. शिक्षकाला लागणारी अंत:स्फूती, विद्यादानाची होेस आणि त्यासाठी करावा लागणार अव्याहत व्यासंग या सर्वाचीच त्यांच्याकडे वानवा आहे. अध्याहत पेशाला जे नोकरीचे हिडींस स्वरूप येवून केवळ तास भरून काढायला म्हणून वर्गाध्यापन करत आहेत. त्यामुळे अध्यापकही विद्यार्थ्याना विचारप्रवर्तक ज्ञान पाजण्यापासून असमर्थ झाले आहेत. त्यामुळे उच्चशिक्षण घेतांना विद्यार्थ्यानी विद्यापीठीय अभ्यासक्रम, आपल्याला ज्ञानार्जन करणारे शिक्षक आणि आपण जागरूक असावे.
आज उच्च शिक्षण म्हणजे संस्था, महाविद्यालयाची मक्तेदारीच पहायला भेटते. कारण विद्यालयांनी आपल्या फी मध्ये केलेली भरमसाठ वाढ. या फी अशाच वाढत राहुल्या तर विद्यार्थ्याच्या भावी, जीवनावर त्याचा निश्चितपणे अनिष्ठ परिणाम होईल. त्यांचे भवितत्व भयाण होईल असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे होते केबन म्हणतो की 'Knowledge is Power' ज्ञान ही महान शक्ती आहे. "विद्यार्थी वर्गाना जर या ज्ञानाची कास धरून आपल्या देशाचा विकास आणि उध्दार करून घ्यायचा असेल तर त्यांनी विद्यापीठाच्या कारभारात , अभ्यासक्रमांत लक्ष देवून आपल्या हक्कासाठी सतत झगडत राहिले पाहिजे असे आव्हानही करतात.
विद्यापीठीय कारभार जणू काय मक्तेदारीच आहे. कारण विद्यापीठाचा कारभार हाकणारी सिनेटमध्ये बसलेली ही क्रियाशुन्य जुनी धेंडे गेल्याशिवाय विद्यापीठीय कारभार सुधारणार नाही. उलट या जुन्या धेंडाकडूनच विद्यापीठात उघड लाचलुचपतीचे प्रकार सुरू आहेत. विद्यापीठामध्ये अनेक कारभारामध्ये सावळागोंधळ आहे. त्यासाठी विद्यापीठीय उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यानी विद्यापीठीय कारभार, अभ्यासक्रम महाविद्यालय, शिकविणारे, शिक्षक याकडे लक्ष देऊन मानवी मूल्य व सामाजिक मूल्यांचा विकास होऊन राष्ट्रांची प्रगती व आपला विकास कसा होईल त्याकडे लक्ष द्यावे असे आजच्या विद्यार्थ्याना आवाहन करतात.