आशिया खंडामध्ये निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया कशा प्रकारे सुरू झाली ?
उत्तर
आशिया खंडात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया पुढीलप्रमाणे सुरू झाली : i) भारत ही आशियातील परकीयांच्या ताब्यातून मुक्त होणारी पहिली वसाहत होती. भारत स्वतंत्र होताना फाळणी होऊन पाकिस्तान या नव्या राष्ट्राचा उदय झाला.
ii) १९४७ सालीच सिलोनलाही स्वातंत्र्य मिळाले.
iii) ब्रिटिश वसाहत असलेल्या ब्रह्मदेशात ऑगसान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चळवळ तीव्र झाली अखेर १९४८ साली करार होऊन ब्रम्हदेश स्वतंत्र झाला. इ. स. १९४५ पर्यंत फ्रेंच वसाहत असलेल्या इंडो-चीनमधील लोकांनी हो-चि-मिन्हच्या नेतृत्वाखालीफ्रान्सविरुद्ध लढा दिला. पुढे १९५४ ते १९७५ या काळात अमेरिकेच्या नववसाहतवादाविरोधात लढा देऊन १९७५ साली व्हिएतनामचे एकसंध राज्य निर्माण झाले.
iv) डॉ. सुकार्को यांच्या नेतृत्वाखाली ईस्ट इंडिज बेटांतील राष्ट्रवादी गटांनी डचांशी लढा देऊन १९४५ साली इंडोनेशिया हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला.