पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान पद्धतीचे कोणते वैशिष्ट्य तुम्हांला जाणवले

पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान पद्धतीचे कोणते वैशिष्ट्य तुम्हांला जाणवले

प्रश्न

 पहिल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान पद्धतीचे कोणते वैशिष्ट्य तुम्हांला जाणवले ?

उत्तर

 

 

१९५१ साली झालेल्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीच्या मतदान पद्धतीचे मला जाणवलेले वैशिष्ट्य -

i) पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देशात निरक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे मतदान करण्याची पद्धती आणि मतदार यादया तयार करणे ही कामे मोठी आव्हानात्मक होती.

ii) मतदानासाठी चिकटवली २० लाख पेट्या तयार करून त्यावर निवडणूक चिन्हे चिटकवली गेली होती,

iii) ज्या पक्षाला मतदान करायचे त्या पक्षाचे चिन्ह असलेल्या पेटीत मतदारांनी कोऱ्या कागदाची घडी करून टाकायची.

iv) या पद्धतीमुळे निरक्षर लोकांना मतदान करता आले.
Previous Post Next Post