घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल

घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल


प्रश्न

 घराणेशाहीमुळे राजकीय पक्षांचे कोणते नुकसान होत असेल ? 

उत्तर

 


 i) घराणेशाहीमुळे एकाच घराण्याचे पक्षावर वर्चस्व राहते. पक्षातील अन्य लोकांना नेतृत्व करण्याची संधी नाकारली जाते. 

ii) घराण्यात सर्वच व्यक्ती कार्यक्षम असतात असे नाही. अकार्यक्षम वारस पक्षाचे नुकसान करतो.

iii) अकार्यक्षम वारसामुळे पक्षाचा विस्तार होत नाही. त्या वारसाचे दोष पक्षात येऊन पक्षही कमकुवत होतो.

iv) घराणेशाहीमुळे पक्षात हुकूमशाही येते. विरोधी मते दडपली जातात वा त्यांच्याकडे दुर्लक्ष होते व त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही नष्ट होते.

v) घराण्यातील वारस आधुनिक विचारसरणीचे नसतील तर पक्षही प्रतिगामी विचारांचा बनतो व मागास विचारसरणीचा होतो. राजकीय पक्षांची विचारसरणी प्रवाही व काळाप्रमाणे बदलणारी असली पाहिजे.

Previous Post Next Post