निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी कोणत्या निवडणूक सुधारणा कराव्यात असे तुम्हांला वाटते

निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी कोणत्या निवडणूक सुधारणा कराव्यात असे तुम्हांला वाटते

प्रश्न

 निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी कोणत्या निवडणूक सुधारणा कराव्यात, असे तुम्हांला वाटते ?

उत्तर

 

 

निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवण्यासाठी पुढील निवडणूक सुधारणा कराव्यात, असे मला वाटते - 

i) गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणत्याही पक्षाने उमेदवारी देऊ नये व त्यांना निवडणुकीला उभेच राहता येणार नाही, असा नियम करावा.

ii) निवडणुकीत पैशांचा गैरवापर थांबवण्यासाठी निवडणुकीचा खर्च सरकारने करावा. 

iii) निवडणुकीत गैरव्यवहार करणाऱ्या उमेदवारांची ताबडतोब चौकशी होऊन, त्यांना न्यायालयांनी कठोर शिक्षा कराव्यात.

iv) प्रत्येक पक्षाने महिलांना ५०% उमेदवारी दयावी.

v) वरील सर्व बाबतींत सहकार्य न करणाऱ्या राजकीय पक्षांची मान्यता ताबडतोब रद्द करावी.

Previous Post Next Post