आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही काय कराल

आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही काय कराल

प्रश्न

 आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही काय कराल ? 

उत्तर

 

 

आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केली नाही. त्याविरोधात विरोधी पक्षनेता म्हणून मी पुढील बाबी करीन -

i) सभागृहात सरकारला प्रश्न विचारून धारेवर धरीन. सरकारच्या कामातील त्रुटी, सरकारचे दुर्लक्ष या बाबी दाखवून देईन.

ii) आरोग्य क्षेत्रात सरकारने काय केले नाही व काय करायला पाहिजे याबाबत वृत्तपत्रांतून लेख लिहून लोकांना जागृत करीन. 

iii) वृत्तवाहिन्यांवर मुलाखती देऊन सरकारच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे काढीन. 

iv) जनतेला जागृत करण्यासाठी सभांचे, मोर्चाचे आयोजन करून जनआंदोलन उभारीन.

Previous Post Next Post