राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतील मवाळ व जहाल यांच्या योगदानाची माहिती लिहा.
उत्तर
१) मवाळांचे योगदान : १८८५ साली भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. इ. स. १९०५ पर्यंत राष्ट्रीय सभेवर मवाळांचा प्रभाव होता. राष्ट्रीय सभेच्या संस्थापकांच्या ब्रिटिशांच्या उदारमतवादी भूमिकेवर व न्यायाच्या तत्वावर विश्वास होता. सुमारे दोन दशके भारतीयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आवाहन दरवर्षीच्या अधिवेशनात राष्ट्रीय सभा करीत राहिली.
२) जाहलांचे योगदान : राष्ट्रीय सभेच्या मागण्या पूर्ण न झाल्याने राष्ट्रीय सभेतील तरूणांत असंतोष निर्माण झाला. शासनाच्या धोरणावर ते टीका करू लागले. तसेच लोकजागृती करून सरकारवर लोकमताचे दडपण आणण्याची गरज प्रतिपादू लागले. वंगभंग चळवळीत जहालांनी स्वदेशी व बहिष्काराचा कार्यक्रम हाती घेतला. जहाल तरुणांनी वृत्तपत्रे सुरू करून सरकारच्या जुलमी धोरणांवर टीका केली. शांतता मोर्चे काढून सरकारचा निषेध केला. लोकमान्य टिळकांसारख्या जहालवादी नेत्यांना सरकारने कडक शिक्षा दिल्या.