स्वराज्यात सावकारांचे काय स्थान असते ते लिहा

स्वराज्यात सावकारांचे काय स्थान असते ते लिहा

सावकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा असे रामचंद्र अमात्य कां म्हणतात ?

किंवा 

साहूकाराचे संरक्षण कां करावे ते लिहा ?

किंवा 

स्वराज्यात सावकारांचे काय स्थान असते ते लिहा ?

साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा असते. साहूकाराकरिता राज्य आबादीत होते. न मिळेल ती वस्तु राज्यांत येते, राज्य श्रीमंत होते. कुठल्याही सकंटप्रसंगी पाहिजे ते कर्जवाम मिळते, तेणे करून आले संकट परिहार होते, साहुकाराचे संरक्षणामध्ये चांगला फायदा असतो. साहुकारामुळे राज्यावर आलेले संकट दूर होते. बाजारपेठेमध्ये न मिळणाऱ्या वस्तू मिळतात. कर्ज मिळते, संकटसमयी मदत मिळते, त्यासाठी साहुकाराचे संरक्षण केले पाहिजे त्यामूळे राज्याची व राजश्रीची शोभा वाढते. 

कोणत्याही विषयी सावकारावर उग्र, तापट, तीक्ष्ण, अशा भाषेत बोलून त्यांचा अपमान करू नका. तर बाजारपेतील दुकाने, मालसाठवण्याची जागा, कोठी घालून हत्ती, घोडे, भरजरी, मूल्यवान वस्तू, खाणे-पिणे, लोकराचे वस्त्र इत्यादी वस्त्रजात, रत्ने, शस्त्रे अशा वस्तूंचा संचय करून व्यापार चालवावा. मुख्य व्यापारी केंद्र (राज्याने वसविलेला बाजार) येथे थोर थोर साहुकार 'आणून ठेवावे'. वर्षानुवर्षे त्यांच्याशी सलोख्याने स्नेहपुर्वक, भावसंबंधाने वागणे. लग्नकार्य, सण-समारंभात त्यांना मानाने बोलावून, प्रतिष्ठेने बोलावून त्यांना लग्नकार्यात 'वस्त्रपान' देऊन त्यांचे समाधान करावे. 

दुसऱ्या देशातील जे जे साहुकार असतील त्यांची ही समाधाने करावी, तयास अनुकूल न पडेल तर असतील तेथेंच त्यांचे समाधान रक्षून आपली माया लावून त्यांचे प्रतिनिधी आणून त्यास अनुकूल जागा, दुकाने देऊन राज्यामध्ये ठेवावे. जे साहुकार दर्यावर्दी (समुद्राच्या काठी) असणारे आहेत त्यांना बंदरोबंदरी निरोप पाठवून त्यांचीही सेवा करावी. त्यामूळे राज्यामध्ये कोणत्याही वस्तू सहज मिळतील ते दळणवळण, मालाची ने-आण, करतात यासाठी सेवा करावी. परंतु त्या साहुकारामध्ये जे साहुकार फिरंगी व इंग्रज व बुलदेज, फरासीस व डॅबिश, टोपीकर हे ही लोक सावकारी करतात परंतु वरकड सावकारांसारखे नसतात. 

परक्या देशातल्या प्रत्येक साहुकाराला त्यांच्या त्यांच्या राज्यातीलराजाने पाठवलेले असते आणि त्यांना या प्रांतात प्रवेश करून राज्य वाढवावे अशी आकांक्षा असते. काही ठिकाणी त्यांनी प्रदेश बाळकवला असून आपले स्थळ कधीही सोडत नाहीत. टोपीवर सावकाराला वंखार घालण्यासाठी कदापीही जागा देऊ नये कारण ते जागा वळकावून बसतात. मेल्याशिवाय ते जागा सोडत नाहीत. समुद्राकाठची अथवा जंजिरा किल्ल्यावरची जागा दिल्यास लगेच दारूगोळा, फोेजफाटा, व आरमार आणून त्या ठिकाणी पडक्या किल्ल्याचे बांधकाम करतात. या देशात राज्य करावे अशी त्यांची मनीषा असते. म्हणून वखारी घालण्यास जागा न देण्याची खबरदारी घेण्यास सांगितले आहे. 

टोपीवर सावकारांना जागा देऊ नये, परंतु लांबच खाडी, गाव दोन गावे राजापुरीसारखी जागा 'फारसीसांस' दिला होता, त्या न्याने दोन चार नामांकित थोर शहरे असतील त्यामध्ये जागा द्यावी. अशी जागा द्यावी की शहरातील पडकी जागा द्यावी. तेथे त्यांनी बांधू देऊ नये. अशा अटीनुसार राहिले तर बरे ! नाही तर त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रयोजन नाही म्हणून आलेल्या वाटेने जाण्यास सांगावे किंवा आपण अशा साहुकारांच्या व्यवहारामध्ये पडू नये. शत्रूच्या मुलखांतील शत्रु मुलुख मारील्यामूळे अथवा दर्यावर्दीमूळे साहुकार सांपडले तर सवड काढून, वेळ पाहूनच त्यांच्याशी खंडणी देण्यासंबंधी करार करावा. खंडणी वसूल करणे त्यांचे अधिकार राखून ठेवावे. खंडणी वसूल झाल्यावर थोडीबहुत त्याचा पाहुणचार करावा. परक्या मुलखावर त्यांच्या पाठवून द्यावे. 

Previous Post Next Post