बोल्शेव्हिकांनी केरेन्स्कीच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार बरखास्त केल्याने जाहीर का केले

बोल्शेव्हिकांनी केरेन्स्कीच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार बरखास्त केल्याने जाहीर का केले

बोल्शेव्हिकांनी केरेन्स्कीच्या नेतृत्वाखालील हंगामी सरकार बरखास्त केल्याने जाहीर का केले ?

उत्तर 

i) १५ मार्च १९१७ रोजी रशियाच्या झारने सत्तात्याग केला आणि केरेन्स्की या मेन्शेव्हिक म्हणजे मवाळ नेत्याच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले. 

ii) या सरकारने जर्मनीविरुद्ध युद्ध चालूच ठेवले. या युद्धात रशियन सैन्याने सपाटून मार खाल्ला. 

iii) केरेन्स्कीचे सरकार सामान्य जनतेत अप्रिय ठरले होते; कारण या सरकारात जमीनमालक, भांडवलदार, उत्पादक व व्यावसायिक यांचेच प्रतिनिधी होते. 

iv) या काळात हद्दपार असलेला लेनिन जर्मनीच्याच मदतीने रशियात परतला. त्याने कामगार गटांच्या (सोव्हिएत्स) चळवळी संघटित करण्यास सुरुवात केली. 

v) मेन्शेव्हिक  व बोल्शेव्हिकांत संघर्ष होऊन अखेर ७ नोंव्हेबर १९१७ रोजी बोल्शेव्हिकांनी केरेन्स्कीचे हंगामी सरकार बरखास्त केल्याने जाहीर केले. 


Previous Post Next Post