बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे

प्रश्न

 बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.

उत्तर

 

  

i)  ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र-शिलालेख कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. 

ii) बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात.

iii) थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळातील नगरांची वर्णने असतात.

iv) तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. वर्णने इतिहासलेखनाला उपयुक्त ठरतात; म्हणून 'बखर' हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.


Previous Post Next Post