इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही

इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही

प्रश्न

 इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही. 

उत्तर

 


i) वैज्ञानिक पद्धतीत प्रयोग आणि निरीक्षण यांचा वापर करून सार्वकालिक नियम मांडणे शक्य होते.

ii) इतिहास संशोधनात घटना या इतिहासात घडून गेलेल्या असतात.

iii) या घटनांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे हजर नसतो. त्या घटनांची वर्तमानात - पुनरावृत्ती करता येत नाही. 

iv) एका विशिष्ट घटनेवरून इतिहासात सार्वकालीन व सार्वत्रिक नियम मांडणे व ते नियम पुन्हा सिद्ध करणे शक्य होत नसते. म्हणून इतिहास संशोधनात प्रायोगिक व निरीक्षण पद्धतींचा वापर करता येत नाही.


Previous Post Next Post