डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत

डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत

प्रश्न

  डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत . 

उत्तर

 

 

i) चार्लस् डार्विनने नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. यासाठी त्याने विविध प्रदेशांतील वनस्पती व प्राण्यांचे असंख्य नमुने गोळा करून त्यांच्या निरीक्षणांवरून 'सक्षम ते जगतील' असे मत मांडले. 

ii) याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की, सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. निर्माण झालेले जीव जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा करतात. जो सक्षम असतो तो या स्पर्धेत टिकून राहतो. 

iii) सक्षम जिवाच्या शरीरात जगण्यासाठी आवश्यक गुणधर्म असतात. हे निसर्गच निवडतो. निसर्गात सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे टिकाव धरू शकत नाहीत. 

iv) जगलेले जीव पुनरुत्पादन करून स्वत:च्या वेगळ्या वैशिष्टयांसकट नवीन प्रजाती तयार करतात. 

v) हा सिद्धांत 'ओरिजिन ऑफ स्पिसीज' (Origin of Species) या डार्विनच्या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे. डार्विनचा नैसर्गिक हा सिद्धांत सर्वमान्य आहे; कारण निसर्गातील अनेक उदाहरणांवरून तो स्पष्ट होतो.    

Previous Post Next Post