मोहीब कादरी यांच्या ईद या कथेचे कथानक थोडक्यात लिहा

मोहीब कादरी यांच्या ईद या कथेचे कथानक थोडक्यात लिहा

मोहीब कादरी यांच्या 'ईद' या कथेचे कथानक थोडक्यात लिहा ?

उत्तर 

मोहीब कादरी यांनी 'ईद' ही कथा यांच्या 'आठवणी जुन्या शब्द नवे' या स्फुटलेखसंग्रहातील आहे. या  कथेमध्ये ईद या सणदिवशीची लगबग, गोड-धोड पदार्थ, नवीन कपडे, आई-वडीलांबरोबर इतर मंडळीच्या भेटीचे वर्णन, नमाज व प्रार्थना आणि भारतीय एका गरीब मुस्लीम कुटूंबाची आर्थिक परिस्थिती याचे वर्णन प्रस्तूत कथेतून साकार झाले आहे. 

कथेच्या सुरुवातच निवेदक (लेखक) आपल्या लहानपणाच्या आठवणी सांगतो. त्यातून त्याची संवेदनशीलवृत्ती दिसून येते. मुस्लीम समाजामध्ये 'रमजान' चा महिना पवित्र मानला जातो. तो संपत आला की, 'ईद' या सणांचा आनंद ईदचा चंद्र पाहून दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. तीच 'ईद' जवळ येत असल्यामुळे आई-वडिलांचा तणाव वाढत होता. कारण घरची कोेटूंबिक परिस्थिती खूप हलाकीची असल्याने सणाला पैसा लागतो. त्यामुळे त्यांना खुप काळजी वाटते. एरवी उपाशी राहुण ईदसाठी काही अन्न-धान्य राखून ठेवले जातात. स्त्री ही कुटूंबाचे दैवत असते. त्या माऊलीने 'ईद' या सणासाठी पुढे सरसावत कुटूंबाला आधार देते. नेहमी प्रमाणे ईदला शेवया, गुलगुले, शिरखुर्मा व नवीन कपडे मिळणार याचा आनंद निवेदक (लेखक) ला झाला आहे. पण नवे कपडे या ईदला मिळाले नाहीत. जुने कपडेच ईस्त्री करून ठेवले जातात कारण घरची आर्थिक परिस्थिती ही जेमतेमच होती. 

दुसऱ्यादिवशी 'ईद' हा सणसाजरा होणार होता. त्यामुळे गावामध्ये दूध व इतर साहित्याची खरेदीची लगबग सुरू झाली. कुठे पैसे दिले; तर कुठे उधार वतू घेऊन आलो. सर्व मुस्लिमेत्तर समाज ईदला गावातील मुस्लिम बांधवांना मदत करते. यातून ऐक्याचा भावना वाढीस लागते. महिनाभर रोजे (उपवास) धरल्यामुळे ईदला आंनदोत्सव मुस्लिम समाज साजरा करतो. म्हणून गावातील मंडळी चांगले दूध देण्याचा प्रयत्न ठेवतात. ईदच्या दिवशी गुलगुले, शेवयाची खीर, शिरखुर्मा, चपाती भात वरण, एवढे पदार्थ खाण्यासाठी मिळत होती. याचा आनंद वाटत होता. नाहीतर एरवी मात्र हायब्रीड ज्वारीची भाकर तिही एक टाईमला मिळालीतर खूप झाले अशी अवस्था निवेदक सांगतो. 

पहाटे सकाळी ईदच्या दिवशी गरम-गरम पाण्याने अंघोळ करावी लागते. त्यामध्ये वर्षातून एकदा अंगाला लावण्यासाठी सुवासिक साबण तेही सर्व कुटूंबाला पुरेल अशा पध्दतीने त्याचा वापर करण्यासाठी आई सांगते. अंघोळ झाल्यानंतर ईस्त्री केलेले कपडे, डोळ्यामध्ये सुरमा आणि कानात अत्तराचे बोळे घालून नमाज पडण्यासाठी गावामध्ये सर्व मुस्लीम समाज एकत्र येतो. गावामध्ये इमाम नाही. गावतीलच एक जाणकार माजी शिक्षक खानसाहेबांच्या नेतृत्वात नमाज होत असे. खानसाहेब सर्वाना रांगेत उभा करून मार्गदर्शन करतात. ईदची नमाज पढण्याची पद्धत सांगतात. ग्रामीण भागामध्ये दोन वेळाच नमाज पडत असल्यामुळे 'नमाज पडण्याची सर्व माहिती नसायची' खानसाहेबांच्या श्लोकपठण व मार्गदर्शन होते. खानसाहेब दुआ प्रार्थना करताना भावूक होतात. त्या पाठोपाठ आम्ही अल्लाहला शरण जाऊन आर्थिक-सामाजीक-शैक्षणिक उन्नतीसाठी विश्वशांतीसाठी दुआ करतात. दुआ संपली की, एकमेकांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा देत गळाभेट घेतली जाते. गावातील बहुतांश मंडळी देखील मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देतात. 

आई-वडील, आजी-आजोबा, बहिण-भाऊ व इतर मंडळी एकत्र येवून शिरखुर्मा, गुलगुले, शेवयाची खीर, चपाती भात वरण, भाजी आणि दस्तरखानच्या दुतर्फा बसून मनसोक्त भोजनाचा आनंद घेतो. भोजनानंतर पाने खाणे इत्यादी गावातील मंडळी ईदच्या दिवशी शुभेच्छा देऊन शिरखुर्मा व गुलगुले या गोड पदार्थाचे सेवन करतात.

Previous Post Next Post