तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल

तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल

प्रश्न

तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल ? 

किंवा 

समजा, शिक्षकांनी क्षेत्रभेटीचे आयोजन तुम्हांला करायला सांगितले तर तुम्ही तपशीलवार नियोजन कसे कराल ?

उत्तर

 

 

क्षेत्रभेटीची तयारी / तपशीलवार नियोजन पुढील प्रकारे करू : 

I) ठिकाणनिश्चिती :

i) क्षेत्रभेटीचे नेमके ठिकाण ठरवणे व त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी व उपलब्ध असलेली वाहतुकीची साधने इत्यादी बाबींचा आढावा घेणे. 

ii) उदा., नदीकिनारा, समुद्रकिनारा, पर्वत, किल्ला, पठार, शेत, थंड हवेचे ठिकाण, कारखाना, रेल्वे स्थानक इत्यादी. 

II) हेतूनिश्चिती : 

i) क्षेत्रभेटीचा नेमका हेतू व अध्ययन निष्पत्ती निश्चित करणे. 

ii) उदा., थंड हवेच्या ठिकाणास व समुद्रकिनाऱ्यास भेट देऊन या दोन ठिकाणांतील हवामानांतील फरकाचा अभ्यास करणे इत्यादी.

III) अत्यावश्यक कागदपत्रांची पूर्तता : 

i) क्षेत्रभेटीसाठी अत्यावश्यक नकाशे, महत्त्वाची माहिती, परवानगी पत्रे इत्यादी बाबींचे संकलन करणे.

ii) उदा., कारखान्यास भेट देण्यासाठी कारखान्याच्या मालकाने / व्यवस्थापकाने दिलेले परवानगी पत्र इत्यादी.

IV) प्रश्नावली निर्मिती :

i) क्षेत्रभेटीच्या हेतूनुसार व निवडलेल्या ठिकाणानुसार प्रश्नावली तयार करणे.

ii) उदा., शेतास भेट देताना शेतकऱ्याकडून माहिती मिळवण्यासाठी पुढील स्वरूपाची प्रश्नावली तयार करणे : 

१. तुमची शेतजमीन कोणत्या पिकासाठी अनुकूल आहे?

२. शेतातील पिकांची नासधूस होऊ नये म्हणून तुम्ही कोणती खबरदारी घेता?

३. तुम्ही शेतीसाठी कोणती जलसिंचन पद्धत वापरता? इत्यादी.

Previous Post Next Post