क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल

क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल

प्रश्न

 क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल ?

उत्तर

 

 

क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करू: 

i) क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी व पिशव्या बरोबर नेऊ. 

ii) क्षेत्रभेटीदरम्यान क्षेत्रभेटीत सामील झालेल्या व्यक्तींकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ. त्यासाठी क्षेत्रभेटीदरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या, ताटल्या, खादयपदार्थांची वेष्टने, उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू.

iii) संबंधित क्षेत्रात माहिती फलक, पथनाट्ये, सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव-जागृती वाढवू. 

iv) संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे/मुलाखतीद्वारे संपर्क साधू.

Previous Post Next Post