वितळतारेमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात, ते सांगा

वितळतारेमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात, ते सांगा

प्रश्न

 वितळतारेमध्ये विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग कसा करतात, ते सांगा. 

उत्तर

 

 

विद्युत उपकरणातून प्रमाणाबाहेर विद्युतधारा जाऊन त्याचे व परिपथाचे नुकसान होऊ नये यासाठी परिपथात एकसर पद्धतीने वितळतार जोडतात. ही तार कमी वितळणांक असलेल्या संमिश्राची (उदाहरणार्थ, शिसे व कथिल यांचे संमिश्र) बनवलेली असते. परिपथातून ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त विद्युतधारा जाऊ लागल्यास तारेचे तापमान एवढे वाढते की, ती वितळून परिपथ खंडित होतो. परिणामी परिपथ व उपकरण यांचे संरक्षण होते.  

Previous Post Next Post