जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते

जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते

प्रश्न

 जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते. 

उत्तर

 

 

i) 40-50 वर्षे वयाच्या स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीचे वय जवळ आलेले असते. 

ii) या शेवटच्या काही वर्षांत अंडाशयातून बाहेर पडणाऱ्या अंडपेशी स्त्रीच्या वयाच्या म्हणजेच 40-50 वर्षे जुन्या असतात. 

iii) अशा अंडपेशींची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते. यामुळे त्या अर्धगुणसूत्री विभाजन व्यवस्थित पूर्ण झालेले नसते. 

iv) अशा विकृत अंडपेशी जर फलित झाल्या तर त्यापासून तयार होणाऱ्या अपत्यांना जन्मतः व्यंग येण्याची दाट शक्यता असते. डाऊन संलक्षण, टर्नर संलक्षण अशा विकृती निर्माण होऊ शकतात.


Previous Post Next Post