मागास जातींवर अत्याचार होऊच नयेत म्हणून कोणत्या प्रयत्नांची गरज आहे

मागास जातींवर अत्याचार होऊच नयेत म्हणून कोणत्या प्रयत्नांची गरज आहे

प्रश्न

 मागास जातींवर अत्याचार होऊच नयेत म्हणून कोणत्या प्रयत्नांची गरज आहे ?

उत्तर

 

 

शेकडो वर्षे अत्याचार झालेल्या मागास जातींवर लोकशाही शासन पद्धतीत अत्याचार होऊच नयेत म्हणून माझ्या मते पुढील प्रयत्न करण्याची गरज आहे 

i) अत्याचार प्रतिबंधक कायदे अधिक कडक केले पाहिजेत.

ii) या बाबतीतील न्यायालयातील खटले जलद गतीने चालवून अन्यायी व्यक्तींना जबर शिक्षा झाल्या पाहिजेत. 

iii) मागास जाती-जमातींचा आर्थिक स्तर उंचावण्याचे विशेष प्रयत्न करावेत. 

iv) सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत; त्यासाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत. 

v) शासकीय आणि सामाजिक स्तरावर लोकांचे प्रबोधन करून सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, ज्यामुळे लोक अत्याचार करायला प्रवृत्त होणार नाहीत.

Previous Post Next Post