भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती

भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती

प्रश्न

 भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती

उत्तर

 

 

भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत: 

i) भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो.

ii) हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे असमपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे. 

iii) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने तीन विभाग केले जातात. 

iv) अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे.

v) भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांग्लादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास सुंदरबन' म्हणतात. व्हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे. 

vi) उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश 'थरचे वाळवंट' किंवा 'मरुस्थळी' या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. 

vii) अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनदयांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून झाली आहे.

viii) पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झाल्याचे आढळून येते.

Previous Post Next Post