ब्राझीलची उच्चभूमीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

ब्राझीलची उच्चभूमीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

प्रश्न

 ब्राझीलची उच्चभूमीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

उत्तर

 

 

ब्राझीलच्या उच्चभूमीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत :

i) ब्राझील देशातील दक्षिणेकडील भाग विस्तीर्ण पठाराने व्यापलेला आहे. हा भाग ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाते. 

ii) ब्राझील उच्चभूमीची दक्षिणेकडील व पूर्वेकडील भागांतील उंची तुलनेने अधिक आहे व ती १००० मीटरपेक्षा जास्त आहे. इतर भागातील उंची ५०० मीटर ते १००० मीटर दरम्यान आहे.

iii) ब्राझील उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. ब्राझील उच्चभूमीचे उत्तरेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. 

iv) ब्राझील उच्चभूमीच्या उत्तरेकडील उतारावरून अँमेझॉन नदीच्या उपनदयांचा उगम होतो.

v) यांतील काही उपनदयांमध्ये धावत्या व धबधबे दिसून येतात. या नदया पुढे अटलांटिक महासागरास मिळतात.

vi) ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी ननद्या उगम पावतात व पुढे त्या अर्जेंटिना देशाकडे वाहतात. 

vii) ब्राझील उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो अजस्त्र कडा म्हणून ओळखला जातो.

viii) ब्राझील उच्चभूमी (ढालक्षेत्र) व गियाना उच्चभूमी (ढालक्षेत्र) एकत्रितरीत्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभाक्षेत्रे मानली जातात.

Previous Post Next Post