भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याचे कोणते फायदे होतात

भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याचे कोणते फायदे होतात

प्रश्न

 भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याचे कोणते फायदे होतात ? 

उत्तर

 

 

भौगोलिक ज्ञानाचे उपयोजन करून प्रदेशाचा अभ्यास केल्याचे पुढील फायदे होतात :

i) प्रदेशातील प्राकृतिक परिस्थितींची चांगली जाण होते.

ii) प्रदेशातील लोकांनी परिसराशी कसे जुळवून घेतले आहे हे समजते. 

iii) प्रदेशातील संसाधनांचा अतिवापर केल्यास त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे आकलन होते. 

iv) प्रदेशातील पर्यावरणाच्या हासावरील उपायांचा विचार करता येतो.

v) प्रदेशातील विविध घटनांचा क्रम लक्षात येतो व त्यातील बदलांची प्रक्रिया समजावून घेता येते. 

vi) प्रदेशातील नैसर्गिक दुर्घटनांना/आपत्तींना अधिक सक्षमपणे तोंड देता येते. 

vii) प्रादेशिक असमतोलाची कारणे शोधता येतात व त्यानुसार उपाययोजनांचा विचार करणे शक्य होते.

viii) प्रदेशातील भविष्यातील घटनांचा किंवा समस्यांचा अंदाज बांधता येतो.

Previous Post Next Post