सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे संवेदनशील भाग कोणते ? ते थोडक्यात विशद करा.

सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे संवेदनशील भाग कोणते ? ते थोडक्यात विशद करा.

प्रश्न

 सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने आपत्तीचे संवेदनशील भाग कोणते ? ते थोडक्यात विशद करा.

उत्तर

 

 

1. आणीबाणीची अवस्था : आपत्ती आल्यावर आणीबाणीच्या अवस्थेत वेगाने हालचाली करून जास्तीत जास्त होऊ शकणारी जीवितहानी टाळता येते. तसेच शोध आणि बचाव कार्य, वैदयकीय मदत, प्रथमोपचार, संपर्क व दळणवळण व्यवस्था पूर्ववत करण्यात येतात. धोकादायक विभागातून नागरिकांचे स्थलांतर वेळेअगोदरच करून त्यांचे प्राण वाचवता येतात. आणीबाणीच्या काळातच आपत्तीचा अंदाज बांधता येतो.

2. संक्रमणावस्था : संक्रमणावस्थेत आपत्ती ओसरलेली असते. आपत्ती निवारण अथवा पुनर्वसनाचे काम या अवस्थेत चालू करतात. ढिगारे हलवणे, पाण्याचे नळ ठीकठाक करणे, रस्तेदुरुस्ती अशी कामे या अवस्थेत केली जातात. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येते. याच काळात आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन कार्य करण्यास सुरुवात होते. सर्वसाधारणपणे आपद्ग्रस्त नागरिकांना निरनिराळ्या संस्था रोख अथवा इतर मदत याच काळात देतात. त्यांच्यावरील मानसिक आघात कमी करण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी उद्योगधंदे अथवा इतर मिळकतीचे साधन उपलब्ध करून दिले जाते. अशा लोकांचे पुनर्वसन करणे मग शक्य होते.

3. पुनर्निर्माण अवस्था : पुनर्निर्माण अवस्था अत्यंत क्लिष्ट स्वरूपाची असते. याची सुरुवात संक्रमणावस्थेत होते. नागरिक पूर्णपणे पूर्वीसारख्या अवस्थेत येण्यासाठी या अवस्थेची मदत होते. इमारतींची पुनर्बांधणी, रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था पुन्हा सुरू करणे, शेती व्यवसाय पूर्ववत सुरू करणे अशी कामे पूर्ण झाली की पुनर्बांधणीचे काम पूर्णत्वास जाते. ही अवस्था सर्वांत प्रदीर्घ असते.

Previous Post Next Post