इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा

इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा

प्रश्न

 इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा.

उत्तर

 

 

i) सध्याच्या जगात खूप स्पर्धा, असुरक्षितता आणि चढाओढ आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मानसिक ताण-तणावाला सामोरे जावे लागते.

ii) हा तणाव काही काळ मनात तसाच राहिला तर औदासीन्य, नैराश्य आणि तत्सम मानसिक आजार निर्माण होतात.

iii) औदासीन्यातून व्यसने लागू शकतात किंवा आत्मघाताचे विचार मनात येतात. अशा वेळी आपली दुःखे आणि समस्या दुसऱ्याशी बोलण्यामुळे हलकी होतात. 

iv) समुपदेशकांची मदत घेऊन संवादातून समस्या सोडवता येतात.

v) जे लोक आपल्या चांगल्याचा विचार करतात, ते नेहमीच आपली मदत करतात. त्यासाठी सुसंवाद करणे आवश्यक आहे.

Previous Post Next Post