ॲमेझॉनच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

ॲमेझॉनच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

प्रश्न

 ॲमेझॉनच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा

उत्तर

 

 

ॲमेझॉनच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : 

i) ॲमेझॉन नदीचा उगम ब्राझील देशात होत नाही. या नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो.

ii) निग्रो, जापुरा, पुरुस, सिंगू इत्यादी ॲमेझॉनच्या प्रमुख उपनदया आहेत.

iii) ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. ॲमेझॉन नदीतून सुमारे २ लाख घनमीटर प्रति सेकंद एवढ्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होत असतो. 

iv) ॲमेझॉन नदीतून वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. 

v) ॲमेझॉन नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या मुखाशी गाळाचे प्रदेश तयार न होता बेटे तयार होतात. 

vi) ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याजवळ अनेक लहान-मोठी बेटे तयार झालेली आढळतात. उदा., माराजॉ बेट.

vii) ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे १५० किमी आहे. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. 

viii) ॲमेझॉन जलप्रणालीमुळे ब्राझीलच्या पश्चिम व उत्तर भागात मैदानी प्रदेश निर्माण झाला आहे.

Previous Post Next Post