तीन R-मंत्र म्हणजे काय? त्यांचे महत्त्व स्पष्ट करा

तीन R-मंत्र म्हणजे काय? त्यांचे महत्त्व स्पष्ट करा

तीन R-मंत्र म्हणजे काय? त्यांचे महत्त्व स्पष्ट करा

उत्तर

i) तीन R म्हणजेच Reduce, Reuse आणि Recycle. याचा अर्थ कपात, पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण असा होतो.

ii) कपात : साधनसंपत्तीचा वापर कमीत कमी करणे म्हणजे कपात करणे.

iii) पुनर्वापर : वस्तू टाकून देण्याऐवजी त्यापासून पुन्हा काही नवा वापर करणे म्हणजे पुनर्वापर.

iv) पुनर्चक्रीकरण : जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू तयार करणे म्हणजे पुनर्चक्रीकरण होय.

v) तीन R- मंत्राचे महत्त्व : या तिन्ही उपायांनी नव्या वस्तू उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेची कपात होते. प्रदूषणाचे प्रमाणही कमी होते. कच्च्या मालापासून नवीन वस्तू तयार करण्यासाठी लागणारी साधनसंपत्ती वाचवली जाते.

Previous Post Next Post