लैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजननापेक्षा कोणत्या बाबतींत फायदेशीर आहे

लैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजननापेक्षा कोणत्या बाबतींत फायदेशीर आहे

लैंगिक प्रजनन अलैंगिक प्रजननापेक्षा कोणत्या बाबतींत फायदेशीर आहे ?

उत्तर

i) अलैंगिक प्रजननामध्ये नवीन जीवाची निर्मिती एका कायिक पेशीच्या गुणसूत्री विभाजनामुळे होते. 

ii) त्यामुळे नवजात पेशी तंतोतंत जनक पेशीसारखीच असते. 

iii) याउलट लैंगिक प्रजननामध्ये दोन अर्धगुणी भिन्न युग्मकांच्या संयोगाने नवीन सजीवाची निर्मिती होते. 

iv) त्यामुळे नवजात सजीव जनकाशी सर्वच बाबतींत साम्य दाखवत नाही. जननिक परिवर्तनामुळे नवजात सजीवात विविधता येते. 

v) या विविधतेमुळे बदलत्या पर्यावरणाशी जुळवून घेण्यास नदत होते. 

vi) त्यामुळे प्रजातीचे अस्तित्व टिकून राहते. ती नामशेष होण्यापासून स्वतःला वाचवते.

Previous Post Next Post