लैंगिक प्रजनन म्हणजे काय? लैंगिक प्रजननाच्या दोन प्रमुख प्रक्रिया स्पष्ट करा

लैंगिक प्रजनन म्हणजे काय? लैंगिक प्रजननाच्या दोन प्रमुख प्रक्रिया स्पष्ट करा

लैंगिक प्रजनन म्हणजे काय? लैंगिक प्रजननाच्या दोन प्रमुख प्रक्रिया स्पष्ट करा. 

उत्तर 

1. लैंगिक प्रजनन : दोन अर्धगुणी युग्मकांच्या संयोगातून एका द्विगुणी युग्मनजाची निर्मिती होऊन जेव्हा नवा सजीव निर्माण होतो, तेव्हा त्यास लैंगिक प्रजनन असे म्हणतात.

2. लैंगिक प्रजननातील दोन प्रमुख प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहेत:

i) अर्धगुणसूत्री विभाजन : अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रियेत मूळची द्विगुणित गुणसूत्र संख्या निम्मी केली जाते. द्विगुणित जनक पेशींपासून अर्धगुणी स्त्रीयुग्मक व पुयुग्मक तयार होते. (2n →n)

ii) फलन : फलनाच्या प्रक्रियेमुळे दोन अर्धगुणी युग्मकांचा संयोग होऊन द्विगुणी युग्मनज तयार होतो. फलनामुळे गुणसूत्रांची संख्या कायम राखली जाते.

Previous Post Next Post